esakal | 'त्या' तरुणाला बघून भीतीने लोकांच्या अंगावर आला काटा..असे काय घडले.. वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Man is no more who missing from last 3 days found in drain

धनोडी येथील विक्रम ऊर्फ विक्की गायकी हा युवक 24 जुलैला सकाळी 8 वाजता परतवाडा येथील संत्राव्यापाऱ्यांना भेटून येतो, असे कुटुंबीयांना सांगून दुचाकीने घरून निघून गेला होता.

'त्या' तरुणाला बघून भीतीने लोकांच्या अंगावर आला काटा..असे काय घडले.. वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रदीप बहुरूपी

वरुड(जि. अमरावती):  मी कोणालाही घाबरत नाही असे सांगणारे भरपूर लोकं आहेत. मात्र भीती प्रत्येकाला वाटत असते. मात्र बेपत्ता असलेल्या एका युवकाला बघून लोकांच्या अंगावर  अक्षरशः काटा आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

धनोडी येथील विक्रम ऊर्फ विक्की गायकी हा युवक 24 जुलैला सकाळी 8 वाजता परतवाडा येथील संत्राव्यापाऱ्यांना भेटून येतो, असे कुटुंबीयांना सांगून दुचाकीने घरून निघून गेला होता. त्याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत तो कुटुंबीयांशी मोबाइलद्वारे संपर्कातसुद्धा होता. परंतु त्यानंतर त्याचा मोबाइलवर संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरु झाली होती. 

हेही वाचा - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

शोध घेतल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्यात विक्रम ऊर्फ विक्की बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे विक्रमचे रवाळा येथील एका मुलीवर प्रेमसंबंध होते आणि तो नेहमी तिच्या भेटीकरिता जात होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. विक्रमच्या बेपत्ता झाल्याबाबतची माहिती झाल्यानंतर प्रेयसीने विक्रमच्या कुटुंबीयांना माहिती देऊन तो येथे आला होता त्याचे शर्ट, गॉगल आणि मोबाईल माझ्याकडे राहिला तो घेऊन जा, असे सांगितले होते. मात्र अखेर विक्रम सापडला. 

विक्रम सापडला पण... 

या युवकाचा मध्य प्रदेशातील प्रभात पट्टण नजीकच्या सोनगड शेतशिवारात एका नाल्याच्या पायलीमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे विक्रमच्या अंगावर मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रांचे घाव आढळून आल्याने त्याचा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. 

मृतदेह बघितला आणि भीतीने अंगावर आला काटा

काल दुपारच्या सुमारास मध्य प्रदेशातील प्रभात पट्टण नजीकच्या सोनगड शेतशिवारामध्ये बकऱ्या चारणाऱ्या युवकाला सिमेंटच्या पायलीखाली मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर त्याने गावकऱ्यांना माहिती दिली व मुलताई पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची नोंद घेऊन मृतदेह शवविच्छेदनगृहामध्ये ठेवला. मात्र विक्रमचा मृतदेह बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला होता. 

अधिक माहितीसाठी - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...

हत्या झाल्याची शक्यता 

तो मृतदेह धनोडी येथील विक्रम ऊर्फ विक्की गायकी याचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कालच रात्रीच्या सुमारास नातेवाइकांनी शवविच्छेदन गृहामध्ये जाऊन मृतदेहाची ओळख पटवून घेतली. मंगळवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास धनोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रमच्या पोटावर धारदार शस्त्राचे वार असल्याने त्याचा खून झाला असावा, अशी शक्‍यता त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image