esakal | काय सांगता! कैदी येरवडा कारागृहातून महिलेला पाठवायचा अश्‍लील फोटो; कारागृहातून घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Man send Bads photo a woman Amravati crime news

पोलिस पथक फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील अंबवडे येथे देखील जाऊन आले. परंतु, रिकाम्या हाताने परतले. तेथे तपासामध्ये संदीप हा गिट्टीखदान, नागपूर, त्यानंतर संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी, बारामती येथे असल्याचे कळले. तेथेही पोलिसांनी तपास सुरू केला.

काय सांगता! कैदी येरवडा कारागृहातून महिलेला पाठवायचा अश्‍लील फोटो; कारागृहातून घेतले ताब्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्‍लील मॅसेज आणि अश्‍लील फोटो पाठविणाऱ्या युवकास अखेर पुण्याच्या येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. संबंधित युवकाविरुद्ध वरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संदीप सुखदेव हजारे (वय २९, रा. अंबवडे, जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

युवकाविरुद्ध वरुड ठाण्यात विनयभंग व आयटी ॲक्‍ट अन्वये गुन्हा दाखल होता. त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्यात २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी त्याचा विविध टप्प्यात तांत्रिक पद्धतीने तपास करून विविध राज्यांत शोध घेतला. त्याला शोधण्यासाठी सायबर पोलिस राजकोट येथे जाऊन आले. तेथेही तो सापडला नाही.

जाणून घ्या - मोठी बातमी! नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या

पोलिस पथक फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील अंबवडे येथे देखील जाऊन आले. परंतु, रिकाम्या हाताने परतले. तेथे तपासामध्ये संदीप हा गिट्टीखदान, नागपूर, त्यानंतर संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी, बारामती येथे असल्याचे कळले. तेथेही पोलिसांनी तपास सुरू केला. तो पुणे पोलिसांच्या कोठडीत येरवडा कारागृहात असल्याचे कळले. वरुड न्यायालयाकडून आदेश घेऊन पोलिसांनी संदीप हजारे याला येरवडा येथून ताब्यात घेतल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.

वैयक्तिक माहिती शेअर करू नका
नागरिकांनी फेसबुक अकाउंटवर आपली वैयक्तिक माहिती, फोटो शेअर करू नये, तोतयांकडून त्याचा वापर करून बनावट खाते सोशल मीडियावर उघडण्याची भीती असते. अनोळखी व्यक्तीची फेसबुक फ्रेण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये.
- डॉ. हरिबालाजी एन.,
पोलिस अधीक्षक, अमरावती

loading image