अखेर त्या चिमुकलीला मिळाला न्याय. अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

 man who misbehaves with a girl got Life imprisonment punishment
man who misbehaves with a girl got Life imprisonment punishment

गडचिरोली : अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 61 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आशिफ बब्बू कुरेशी, रा. अमिर्झा, ता. गडचिरोली, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये एखाद्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्याचे जिल्ह्याच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण आहे.

घटनेच्या दिवशी 17 वर्षीय पीडित मुलगी अमिर्झा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत खाते उघडण्यासाठी गेली होती. ती अर्ज भरत असताना आशिफ कुरेशी तिच्याजवळ गेला. त्याने बॅंकेचे काम करून देतो, असे सांगून तिच्या मोबाईलमध्ये आपला मोबाईल क्रमांक आणि आपल्या मोबाईलमध्ये तिचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. 

त्यानंतर तिच्यापुढे प्रेम व्यक्त केले. पुढे त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. 10 ऑगस्ट 2014 रोजी संध्याकाळी 4 वाजता पीडित मुलगी घरून एकटीच गावात जात असताना आशिफ कुरेशी याने तिला महेश नन्नावरे यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात नेले व तिथे तिचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी रडली तेव्हा आशिफने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला आणि पुढेही शारीरिक संबंध सुरूच ठेवले. 

शेवटी ती आदिवासी असल्याचे सांगून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित मुलीने 3 नोव्हेंबर 2018 रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी आशिफ कुरेशीविरूद्ध भादंवि कलम 376, 417, 506 तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियमाच्या कलम 4, 6 अन्वये गुन्हा दाखल करून त्याच दिवशी त्याला अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

सोमवारी (ता. 31) या प्रकरणाचा निकाल लागला. पीडित मुलगी व साक्षीदारांचे बयाण, कागदोपत्री पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधीश राजेंद्र मेहरे यांनी आरोपी आशिफ कुरेशी यास भादंवि कलम 376 व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 6 अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड, कलम 417 अन्वये एक वर्षाची शिक्षा आणि 1 हजार रुपये दंड, तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(2) अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

या सर्व शिक्षा आरोपीला एकाचवेळी भोगायच्या आहेत. पीडित मुलीला 50 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक तुंकलवार यांनी जबाबदारी सांभाळली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com