मांगरूडमध्ये पाण्यासाठी हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

उमरेड (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील मांगरूड येते गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, होणारा पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शनिवारी गावात एकच टॅंकर आल्याने पिण्याचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली, प्रकरण हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचले. नागपूरच्या जिल्हा साथरोग प्रतिबंधक आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्थानिक पाणीपुरवठा योजनेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा दोषमुक्त होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

उमरेड (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील मांगरूड येते गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, होणारा पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शनिवारी गावात एकच टॅंकर आल्याने पिण्याचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली, प्रकरण हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचले. नागपूरच्या जिल्हा साथरोग प्रतिबंधक आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्थानिक पाणीपुरवठा योजनेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा दोषमुक्त होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. गावातील लोकसंख्या एकूण सतराशे असून दरडोई पाणी 40 लिटरनुसार सतराशे लोकांना दर दिवसाला 68 हजार लिटर पाणीपुरवठा होणे आवश्‍यक आहे. मात्र, दर दिवशी केवळ दोन टॅंकर पाठविण्यात येत आहेत. यातही टॅंकर वेळेत येत नसल्याने नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे मांगरूडचे माजी सरपंच गब्बर रेवतकर यांनी सांगितले.शनिवारी एक टॅंकर सकाळी आला, त्यानंतर दिवसभर दुसरा टॅंकर आलाच नाही, दुसरा टॅंकर सायंकाळी उशिरा आल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली, यात वादावाद हाणामारी सुद्धा झाली. यापुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी जादाचे टॅंकर पाठवून पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangarod water cricis