esakal | कोरोना सावटाखाली आंब्याचा गोडवा ‘लयभारी’, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

Mango sweet ‘rhythmic’ under the corona sawta, crowd of customers rushing to buy washim akola marathi news

एकीकडे कोरोनामुळे टाळेबंदी झाली. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू मिळणे कठीण झाले. तर दुसरीकडे शहरवासींना टाळेबंदीतही आंब्यांचा गोडवा चाखायला मिळत आहे. आंब्याचे भावांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी मात्र, खरेदीदारांची झुंबड शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. विविध प्रकारचे आंबे बाजारात विक्रीला आले आहेत. टाळेबंदीमुळे आंब्याच्या आवकवर खूप परिणाम पडलेला आहे. यामुळेच आंब्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलल्या जात आहे.

कोरोना सावटाखाली आंब्याचा गोडवा ‘लयभारी’, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झुंबड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रिसोड (जि.वाशीम) : एकीकडे कोरोनामुळे टाळेबंदी झाली. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू मिळणे कठीण झाले. तर दुसरीकडे शहरवासींना टाळेबंदीतही आंब्यांचा गोडवा चाखायला मिळत आहे. आंब्याचे भावांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी मात्र, खरेदीदारांची झुंबड शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. विविध प्रकारचे आंबे बाजारात विक्रीला आले आहेत. टाळेबंदीमुळे आंब्याच्या आवकवर खूप परिणाम पडलेला आहे. यामुळेच आंब्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलल्या जात आहे.


गुजरात, हैदराबाद वरून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. मात्र, या ठिकाणी आंब्याच्या सिजन सुरुवातीलाच गारपीट, वादळी वारा, अवकाळी पावसाने अक्षरशः या राज्यातील आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. यामुळेच आंब्याची आवक कमी झाली आहे. लॉकडाउनमुळे बंद असलेल्या वाहतुकीमुळे आंब्याच्या वाहतुकीस व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी असलेले चेक पोस्टमुळे व्यापाऱ्यांचा वेळ सुद्धा वाया जात आहे. मात्र तरीही कसे का, होईना रिसोड बाजारपेठेत आंबा उपलब्ध झाला असल्याने आंबा शौकिनांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे. आंब्याची गोड चव भेटत असल्याने लहान मुलांमध्ये पण आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाची भीतीसुद्धा आंब्याच्या गोडव्यापुढे फिकी पडली असल्याचे चित्र रिसोड बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावर्षी लॉकडाउनमुळे आंब्याला ग्राहक भेटणार नाही, अशी भीती सुरुवातीला होती. मात्र लॉकडाउनमध्ये दिलेल्या सूटनंतर ग्राहकांनी आंब्यासाठी बाजारात येणे पसंत केले आहे.
-शेख खुदबोद्दीन, किरकोळ फळ विक्रेता, रिसोड

अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानामुळे यावर्षी आंब्याच्या वाहतुकीस खूप त्रास जात आहे. मात्र, ग्राहकांची मागणी वाढत असल्याने कसेबसे प्रयत्न करून आंबा आणण्याचे प्रयत्न होत आहे.
-अकबर बागवान, थोक फळ व्यापारी, रिसोड
 

आंब्याचे दर (किलो)
दसेरी........ 110
केसर.........110
लालबाग...... 60
बादाम..........60
कलमी.........50 

loading image