Manoj Jarange Patil : ‘जनता तुम्हाला खाली खेचू शकते!’ यांचा इशारा

सरकार आणि ज्ञानेश कुमारांची मिलीभगत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप; 'जनता सत्तेवरून खाली खेचेल' असा सरकारला दिला थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तातडीने हटवून त्यांच्या जागी दुसऱ्या निष्पक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची थेट मागणी केली आहे. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यात मिलीभगत असल्याचा संशय बळावत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करताना जरांगे यांनी, "जर जनता तुम्हाला डोक्यावर बसवून सत्तेवर आणू शकते, तर तीच जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्याची ताकदही ठेवते," असा थेट इशारा सरकारला दिला आहे. मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आणि संयमाचा बांध सुटल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com