Manoj Kumar : अमरावती बाजारात मनोजकुमारने पेटविले होते तरुणांमध्ये स्फुल्लिंग
Amravati News : २९ वर्षांपूर्वी अमरावतीच्या भाजीबाजारात मनोजकुमार यांनी दिलेल्या भाषणाने तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना जागवली होती. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा रंगल्या होत्या.
अमरावती : भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’... हे गीत सुरू असतानाच हजारोंच्या जमावाकडून भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा सुरू झाल्या आणि अवघा भाजीबाजार व परिसर दुमदुमून गेला.