डॉक्‍टर म्हणतात, तुम्हीच सांगा आता आम्ही काय कराव?

Many employees quit jobs because of Corona's fears
Many employees quit jobs because of Corona's fears

अमरावती : एकीकडे सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना खासगी डॉक्‍टरांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश खासगी दवाखाने तसेच मोठ्या रुग्णालयांतील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीलाच रामराम ठोकल्याने डॉक्‍टर मंडळींसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. अनेक कर्मचारी भाड्याने राहत आहेत, मात्र घरमालकांकडून दबाव येत असल्याने अनेकांनी नोकरीला काही दिवस रामराम ठोकल्याचे सांगितले जात आहे. 

सध्या देश तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांपासून ते विशिष्ट, अतिविशिष्ट वर्गातील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. रुग्णालयात किंवा दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आता व्यक्त केली जात असल्याने शहरात भाड्याने राहणाऱ्या परिचारिका किंवा खासगी रुग्णालयात काम करणाऱ्यांना घरमालकांकडून घर सोडण्यास दबाव आणला जात असल्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.

पर्यायाने अनेकांनी जिवाच्या भीतीने डॉक्‍टरांकडील नोकरीला रामराम ठोकला आहे. अनेकांनी काही अटीवर नोकरी सुरू ठेवली आहे. काही तासच ड्युटी करण्यावर काहींचा भर आहे. त्यामुळे डॉक्‍टरांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाकडून ओपीडी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, मात्र ओपीडी सुरू असतानाच रुग्णालयात कर्मचारीच नसतील तर कसे काय मॅनेज करावे, असा प्रश्‍न डॉक्‍टरांना पडला आहे.

डॉक्‍टरांकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्यांच्या आरोग्याची आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असतानाही कोरोनाच्या भीतीपोटी अनेकजणांनी नोकरीवर येण्यास असमर्थता दर्शविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com