esakal | मला तर होणार नाही ना...ची भीती; वृद्धांना उद्भवतायेत या समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

problems are causing the elderly in washim.jpg

दैनंदिन जीवनात घराबाहेर पडून काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरातच राहिल्यामुळे अनेकांना तणावाच्या समस्या उद्‍भवू लागल्या आहेत.

मला तर होणार नाही ना...ची भीती; वृद्धांना उद्भवतायेत या समस्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) : सर्व जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ने सर्वसामान्यांच्या समस्या वाढविल्या आहेत. गेली 25 दिवसांपेक्षा जास्त झालेल्या लॉकडाउनमुळे कुटुंबाचे-कुटुंब एकत्र राहत आहेत. दैनंदिन जीवनात आवश्‍यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाजारात जावे लागते. साहित्य आणल्यानंतर संबंधित व्यक्तीपासून मला कोरोनाची लागन त झाली नसणार ना! थोडीही सर्दी, खोकला असला की, संशयाची भीती निर्माण होते. घरात बसल्याने लहान मुलासोबतच वृद्धांच्याही समस्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

दैनंदिन जीवनात घराबाहेर पडून काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरातच राहिल्यामुळे अनेकांना तणावाच्या समस्या उद्‍भवू लागल्या आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ मंडळींनी उपाय सूचविले असून, घरातच राहून विविध गोष्टींमध्ये मन रमविल्यास मानसिक तणावातून दिलासा मिळू शकेल असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. लहान मुल, तरुण, वृद्ध किंवा महिला या सर्वांवर लॉकडाउनचा परिणाम घडून येत असल्याचे चित्र आहे.

आवश्‍यक वाचा - सॅनिटेशन टनलचा वापर करता, मग हे वाचाच!

मुलं शाळेत, माणसं ऑफिस किंवा व्यवसायात, वृद्धमंडळी समवयस्कांसोबत तर महिला देखील दैनंदिन घरकामात व्यस्त असतात. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच कोंडून पडले आहेत. यामुळे अनेकांच्या मानसिक स्थितीत चलबिचल सुरू झाली आहे. यात सर्वाधिक समस्या वृद्धांच्या असून, नागरिकांत कोरोनाची धास्ती कायम आहे. मनातील होणाऱ्या बदलाला वैद्यकीय भाषेत डिस्ट्रेस असे म्हंटल जाते. यात सर्वाधिक तक्रारी ‘मला तर कोरोना होणार नाही न’? ही आहे. यावर अनेकजण मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही घेत आहेत हे विशेष ! यात मुलं, तरुण, वृद्ध आणि महिला अशी वर्गवारी करता येईल. या सर्वांच्या समस्या व अडचणी वेगवेगळ्या आहेत.

हेही वाचा - मौत-हयात अल्लाह के हाथ में है...ये कोरोना क्या चीज है!

तरुणांमध्ये भविष्याची चिंता
भविष्याची चिंता सर्वाधिक तरुणांना असते. अभ्यास करून चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी यादृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, सध्या शाळा, कॉलेज बंद असल्याने आणि ते कधीपर्यंत बंद राहील हे देखील माहित नसल्याने तरुणांमध्ये तणाव (डिस्ट्रेसनेस) वाढताना दिसत आहे. खासगी व्यवसाय देखील आर्थिक तंगीत येणार आहेत. त्यामुळे नोकरदारवर्गाला नोकरी स्थैर्याची चिंता लागून आहे. पगार नाहीत, हातातील पैसे संपले आहेत. हे कधीपर्यंत चालेले याचीही शास्वती नाही. यातून चिडचिड, चिंता, भीती या समस्या पुढे येत आहेत. मात्र, हे समस्या आपल्या एकट्याची नसून सर्व जगाची आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवे.

वृद्धांनी लॉकडाउनकडे औषध म्हणून पहावे
वयस्क मंडळींचा दिनक्रम ठरलेला असतो. सकाळी फिरायला जाणे, समवयस्क मित्रांशी गप्पा मारणे हे प्रामुख्याने आले. मात्र, सध्या वृद्ध मंडळी घरीच आहेत. दिवसभर घरात बसून बारीक गोष्टींवरूनही त्यांची चिडचिड होऊ लागली आहे. यालाच (ओसीडी) ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर म्हणतात. लॉकडाउनमुळे त्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. अशावेळी वृद्ध मंडळींनी लॉकडाउनकडे औषध म्हणून पाहावे.

मुलांचा स्क्रिनटाइम कमी करावा
मुलं स्वच्छंदी आयुष्य जगणारे असतात. अशावेळी त्यांना एकाच जागेवर थांबवून ठेवले तर त्याचा विपरीत परिणाम घडतो. अशीच स्थिती सध्या मुलांची झाली आहे. मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यांचे रोजचे रुटीन असंतुलित झाले आहे. रात्रीचे जागरण वाढले आहे. सतत टीव्ही आणि मोबाइलवर वेळ घालवला जातोय. मित्र-मैत्रिणींशी दुरावा झालाय. सारखे घरी राहून मुलांच्या मेंदूमध्ये एंडोसीन नावाचा हॉर्मोन तयार होतो. त्यामुळे त्यांच्यात चिडचिड आणि तणाव (डिस्ट्रेस) वाढतोय.