ट्रकला दुचाकीची धडक, दोघे गंभीर जखमी

राजेश सोलंकी
गुरुवार, 4 जानेवारी 2018

आर्वी जि. वर्धा - आर्वीहून तळेगावला जाणाऱ्या दुचाकीस्वारने वर्धामनेरि लगत आमराईत उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. ३ जाने) रात्री ८ च्या दरम्यान घडली. संदीप गोपीनाथ निखाडे (वय ५०) रा. विठ्ठल वार्ड आणि अशोक अल्टे रा. वर्धामनेरि असे गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठवले. दुचाकीचा Mh 32/9162 आणि ट्रकचा Mh 40/4935 असा क्रमांक असून ट्रक चौरसिया कंस्ट्रक्शन कंपनी पुलगाव यांचे मालकीचा आहे. 

Web Title: Marathi News Accident Truck Two wheeler Two people injured

टॅग्स