दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यूनंतर १५ किमी प्रवास

राजेश सोलंकी
सोमवार, 15 जानेवारी 2018

आर्वी (जि. वर्धा) - आर्वी तालुक्यातील मांडला गावाजवळ कालव्यातील काटेरी झुडुपात अडकलेल्या अवस्थेत दोन वर्षांच्या बालकाचा मृतदेह रविवारी (ता. १४) आढळल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या घटनेची नोंद आर्वी पोलिसात रात्री उशीरापर्यंत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या गेले.

युवराज संजय चव्हाण (वय २ वर्ष) रा. सिरकुटनि ता. आष्टी जि. वर्धा असे या बालकाचे नाव असल्याचे उघडकीस आले. संजय चव्हाण हे मदनि जि. वर्धा येथील रहीवासी असून ते रोजगारीच्या शोधात उदरनिर्वाह कर्न्यासाथि शिरकुट्नि येथे राहण्यास आले होते. घटनाचे दिवशी संजय चव्हाण हे दोन मुलासोबत घरीच होते. ते मुकबधिर आहेत. त्याच ठिकाणी जवळून अप्पर वर्धा कालवा गेला आहे. त्यांची पत्नी शेतमजुरीच्या कामाला गेली होती.

दरम्यान युवराज घरातून अचानक शनिवारी (ता. १३) दुपारी घरातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे सर्वत्र त्याचा शोध घेणे सुरु होते. शेवटी राजु पवार आणि सुरेश चव्हाण यांनी तळेगाव पोलिस ठाणे येथे जाऊन घटनेची माहिती दिली. मात्र तेथील उपस्थित अधिकारी यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या या दोघांनी पुन्हा रात्रभर परिसरात शोध घेतला त्यानंतरहि कालव्याचे काठाचे शोधात गेले असताना १५ किमीवर आर्वी तालुक्यातील मांडला कालव्यात युवराजचा मृतदेह आढळला. या घटनात पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने परिसरात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: marathi news two year old boy deadbody found