मुलाच्या शिक्षणसाठी जमवलेले पैसे चोरले

thief
thief

आर्वी (वर्धा) : शेतकऱ्याने सोने गहाण ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी काढलेले पैसे चोरट्याने हिसका मारुन पळविल्याची घटना साइनगर येथे सायंकाळी शुक्रवारी (ता. ४) घडल्याने एकच खळबळ उडाली. प्रफुल्ल वानखेडे (रा. आर्वी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी या त्यांनी सोने गहाण ठेवून नादुरा बँकेतून १ लाख २५ हजाराची उचल केली. ही रक्कम त्यांना त्यांचे शिक्षक मित्र मनोहर सावरकर (रा. साईनगर) यांना द्यायची होती. ते या शिक्षकाच्या घरी गेले असताना ते घरी नसल्याने वानखेडे यांनी भ्रमणध्वनीवरुन बोलत असताना पाळतीवर असलेल्या एका युवकाने त्यांच्या दुचाकीवर समोर असलेल्या पैशाच्या पिशवीला हिसका मारुन पोबारा केला. त्याने काळी पँट आणि गुलाबी शर्ट घातला होता. पुढे हा चोर नाल्यातून पळून गेला. 

प्रफुल्ल  वानखेडे आणि मनोहर सावरकर या दोघांची मुले कोटा (राजस्थान) येथे शिक्षण घेत आहेत. सावरकर हे शनिवार (ता. ५) ला कोटा येथे जात असल्याने त्यांच्याजवळ मुलांसाठी वानखेडे यांना पैसे द्यायचे असल्याने ही रक्कम सोने ठेवून घेण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक चौधरी यांनी पथकासह तपास सुरु केला मात्र तपास लागला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com