सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन

राजेश सोलंकी
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

वाल्मिकी समाजाबद्दल या सिनेकलाकारांनी अपशब्द बोलल्याबद्दल या समाजाने राग व्यक्त केला. सलमान खान शिल्पा शेट्टी यांची प्रतिकृती तयार केली ता आणून त्याला काळे फासुन निषेध व्यक्त केला. चपलाचा हार चढवुन अज्ञात ठिकाणी प्रतिमेचे दहन केले. 

आर्वी (जि. वर्धा) : येथील वाल्मिकी समाज युवा एकता समाजाचे वतिने अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी मौलाना अंसार रजा यांचा जाहीर निषेध करण्यात येउन त्यांच्या पुतळ्याचे दहन बुधवारी (ता २७) दुपारी करण्यात आले.

झी हिंदुस्तान टीव्हीच्या मुलाखतीत जातीयवाचक भंगी शब्दाचा उपयोग करुन वाल्मिकि समाजाचा अपमान केला. समाजाच्या भावना दुखावलयाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. अन्यथा अनेक ठिकाणी मोर्चे काढले जाउन याचे तिव्र पडसाद भारतात उमटेल. याला शासन प्रशासन जबाबदार राहिल, असे भारताचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजकल्याण मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आदिना पाठविलेल्या निवेदनात नमुद आहे.

वाल्मिकी समाजाबद्दल या सिनेकलाकारांनी अपशब्द बोलल्याबद्दल या समाजाने राग व्यक्त केला. सलमान खान शिल्पा शेट्टी यांची प्रतिकृती तयार केली ता आणून त्याला काळे फासुन निषेध व्यक्त केला. चपलाचा हार चढवुन अज्ञात ठिकाणी प्रतिमेचे दहन केले. तत्पूर्वी उपविभागिय अधिकारी यांना युवा एकता संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन देउन न्यायाची मागणी केली. याप्रसंगी नगरसेवक नरसिंग सारसर, सुंदरलाल टाक, जुम्मन टाक, शांतिलाल सारसर, सुशिल चावरे, गोडले, प्रविण पवार, धीरज सारसर, प्रविण बोयत, अशोक चावरे, रमन चावरे, मिथुन गोडले, रवि घावरे, जय टाक, विकि चाव्रे, गोलु गोहर, हरिश बोयत आदी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Marathi news Wardha news protest against Salman Khan, Shilpa Shetty