खोटे सोने देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद

राजेश सोलंकी
मंगळवार, 2 जानेवारी 2018

या आठ जणांच्या टोळीने बनावटी सोने असली भासवून स्वस्त सोन्याचे आमिष नागरिकांना देऊन अनेक ठिकाणी गंडा घातला. इतर राज्यातही या टोळीने गंडा घातलाचा संशय पोलिसांना आहे.

आर्वी (जि. वर्धा) : आर्वी तालुक्यातील खरा गना पोलिसांनी ८ जणांच्या मोठ्या टोळीला शिताफीने अटक करून अर्धा किलो बनावटी सोने ८ मोबाईल, एक कार, नगदी पैसे असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना सोमवारी नववर्षाच्या प्रथम दिनी घडली.

या आठ जणांच्या टोळीने बनावटी सोने असली भासवून स्वस्त सोन्याचे आमिष नागरिकांना देऊन अनेक ठिकाणी गंडा घातला. इतर राज्यातही या टोळीने गंडा घातलाचा संशय पोलिसांना आहे.

एवढेच नव्हे तर अनेकांना लुबाडणाऱ्या या टोळीतील काही जण तोतया पोलिस म्हणून वावरत होते. पोलिसांनी सापळा रचून मोरांगना येथील शुभम बग्गा प्रविन गूडवार सुनील अड्किने आदी काही युवकांच्या सहकार्याने हि कार्यवाही करुन टोळीला पकडण्यात यश प्राप्त केले. पोलिस अधिक्षक निर्मलादेवी उपविभाग पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शननात खरांगना ठाणेदार निशिकांत रामटेक, मनिष श्रीनिवास, स्वप्निल भारद्वाज, सचिन पवार, सलाम कुरेशी, किशोर अतुलकर, सुभाष भोयर, राजेश दाफ, प्रीतम इंगोले, जगदीश डफ, राजेश शेंदी आदींनी केली.

Web Title: marathi news Wardha news thief