esakal | चित्रपट नव्हे, तर सत्य घटना! शुभमंगलापूर्वी 'तो' म्हणाला 'ही' माझी प्रेयसी अन् घडला चकीत करणारा प्रसंग
sakal

बोलून बातमी शोधा

marriage cancel when bride lover come in function in yavatmal

एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवासह नातेवाइकांची भंबेरी उडाली तर, नववधू भोवळ येऊन खाली पडली. हा कुण्या चित्रपटातील नाही तर, एका विवाह सोहळ्यातील प्रसंग आहे.

चित्रपट नव्हे, तर सत्य घटना! शुभमंगलापूर्वी 'तो' म्हणाला 'ही' माझी प्रेयसी अन् घडला चकीत करणारा प्रसंग

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : वधूमंडपी विवाहाची पूर्ण तयारी झाली. वर्‍हाडी वाजत गाजत मंडपात दाखल झाले. नववधू साजश्रृंगार करून भावी आयुष्याची स्वप्न बघत मैत्रीणीच्या गराड्यात बोहल्यावर चढली. नवरदेव आधीच वाट पाहात बसलेला होता. विवाह सोहळा सुरू होणार तितक्यात एक तरुण मंडपात आला आणि ही माझी प्रेयसी आहे, असे म्हणत गोंधळ घातला. एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवासह नातेवाइकांची भंबेरी उडाली तर, नववधू भोवळ येऊन खाली पडली. हा कुण्या चित्रपटातील नाही तर, एका विवाह सोहळ्यातील प्रसंग आहे.

हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा

लग्न म्हणजे दोन जिवाचे मीलन. आयुष्यभराची जोडी जोडण्यासाठी दोन परिवार एकत्र आले. त्यांनी रविवार (ता.17) विवाहाची तिथी ठरविली. अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील नवरदेवाची वरात उमरसरा परिसरातील मराठी शाळेत दाखल झाली. विवाहाची वेळ जवळ येऊन ठेपल्याने वधूकडील मंडळी कामात व्यस्त होती. तर, वराकडील मंडळीही आनंदात होते. मात्र, अचानक एक तरुण मंडपात आला आणि अवघ्या काही क्षणात आनंदावर विरजण पडले.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

बोहल्यावर चढलेल्या तरुणीकडे बघून तरुणाने ही माझी प्रेयसी आहे, अशी संवाद फेक केली. गोंधळलेल्या परिस्थितीत नवरदेवाकडील मंडळींनी थेट अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. नवरी नेण्यासाठी आलेले वऱ्हाडी दु:खी अंतःकरणाने आपल्या गावाकडे माघारी फिरले. तो तरुण मुलीच्या नात्यातीलच असल्याची माहिती आहे. हा धक्का सहन न झाल्याने नववधू भोवळ येऊन खाली कोसळली. तिला उपचारासाठी नातेवाइकांनी रुग्णालयात नेले. अचानक एन्ट्री करणार्‍या तरुणामुळे एका सुखी संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच डाव मोडला.

loading image
go to top