Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

वाखारी (पिंपळगाव) येथील विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून जीवन संपविल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.
varsha wagh, khushi wagh and siddhi wagh

varsha wagh, khushi wagh and siddhi wagh

sakal

Updated on

देवळा - देवळा तालुक्यातील वाखारी (पिंपळगाव) येथील विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. बुधवार (ता. २२) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. वर्षा जयेश वाघ (वय ३१), सिद्धी जयेश वाघ (वय ७), खुशी जयेश वाघ (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com