Maruti Chitampalli : अरण्यऋषींची अंतिम इच्छा राहिली अपूर्ण; मारुती चितमपल्लींच्या अस्थी अखेर नवेगावबांध जलाशयात विसावल्या
Gondia News : अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या अस्थी वनक्षेत्रात पुरण्याची इच्छा अखेर अपूर्णच राहिली. वनविभागाच्या परवानगीअभावी त्यांचे अस्थी नवेगावबांध जलाशयात विसर्जित करण्यात आले.
नवेगावबांध (जि. गोंदिया) : सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ, निसर्ग लेखक, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या अस्थी वनक्षेत्रात माधवराव डोंगरवार यांच्या समाधीजवळ पुरण्याची परवानगी शेवटपर्यंत वनविभागाने दिली नाही.