पालांदूर - अचानक मधमाशांनी हल्ला चढविल्याने धान कापणी करत असलेल्या महिला मजुर गंभीर जखमी झाल्या. सर्व गंभीर महिला मजुरांना ग्रामीण रुग्णालय पालांदूर व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मऱ्हेगाव शिवारात घडली.