मम्मी-पप्पा भांडतात म्हणून सोडले घर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - उच्चशिक्षित असलेले मम्मी-पप्पा घरात नेहमी भांडण करतात. त्यामुळे माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही. रोजच्या कटकटीला कंटाळून मी घर सोडून गेलो. मला घरी परत जायचेसुद्धा नाही, अशी व्यथा दहा वर्षाच्या मुलाने पोलिसांसमोर मांडली. नागपुरातील एक मुलगा घर सोडून रेल्वेने निघून गेला. त्याला तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला आणण्यासाठी अजनी पोलिस तेलंगणाला रवाना झाले आहे. मयांक असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलाचे नाव आहे.

मयंकची आई आशा ही मानेवाडा रोडवरील एका शाळेत कर्मचारी आहे तर त्याचे वडील आजारी आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. मात्र, घरात पती-पत्नीमध्ये घरगुती वाद होतात. मयंक हा भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाचवीत शिकतो. मात्र, सध्या सुट्या असल्यामुळे तो आईसोबत शाळेत येतो आणि घरी परततो. त्याच्यासमोरच आईवडिलांमध्ये कडाक्‍याचे भांडण होते आणि  हाणामारी होते. घरातील कलहामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता. आईवडिलांमुळे मित्रांचेही घरी येणे-जाणे कमी झाल्याची खंत त्याला होती. रोजच्या कटकटीला कंटाळून घर सोडून जाण्याचा बेत त्याने आखला.

नेहमीप्रमाणे तो आईसह शनिवारी दुपारी आईसह सकाळी शाळेत आला. आई कार्यालयीन कामात व्यस्त असल्याचे पाहून तो बाहेर पडला. त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेने तेलंगणाला पोहोचला. तोपर्यंत नागपुरात मुलाचे अपहरण झाल्याची अफवा पसरली. 

अजनीत गुन्हा दाखल
मयंकच्या आईने अजनी पोलिस स्टेशनमध्ये मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लगेच तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. मुलाचा शोधासाठी धावपळ सुरू केली. मात्र, आज रविवारी सकाळी तेलंगणा पोलिसांचा फोन आल्याने अजनी पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

भूक लागल्याने लागला हाती
मयंक शनिवारी रात्री तेलंगणा रेल्वे स्टेशनवर पोहोचला. त्याने कशीबशी रात्र रेल्वेस्थानकावर काढली. सकाळी मात्र भूक लागल्यामुळे तो व्याकूळ झाला. त्यामुळे तो रेल्वे स्टेशनवर एकटाच फिरत होता. एका प्रवाशाने त्याला खायला दिले. शेवटी रेल्वे पोलिसांनी त्याची विचारपूस केल्यानंतर तो रडायला लागला. त्याने घडलेला प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी तातडीने नागपूर पोलिसांना फोनवरून कळविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayank home father mother dispute