
नागपूर : वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या सरकारकडून गंभीरतेने सोडवल्या जात नसल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर उमटत आहे. मागण्यांकडे लक्ष न दिल्यास लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनने डॉक्टर दिनाच्या पर्वावर दिला आहे.