esakal | कन्हान डायव्हर्शन प्रोजेक्‍टसाठी बैठक होणार
sakal

बोलून बातमी शोधा

भोपाळ

कन्हान डायव्हर्शन प्रोजेक्‍टसाठी बैठक होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि. नागपूर): "कन्हान डायव्हर्शन प्रोजेक्‍ट'साठी मध्य प्रदेश सरकारने जमीन उपलब्ध द्यावी, अशी मागणी रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंग (गज्जू) यादव, चंद्रपाल चौकसे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना केली. याबाबत बैठक घेणार असल्याचे आश्‍वासन मध्य प्रदेश सरकारने त्यांना दिले. 
कॉंग्रेसचे महासचिव तसेच रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक व सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या माध्यमातून उदयसिंग (गज्जू) यादव यांच्या नेतृत्वात रामटेक विधानसभाचे शिष्टमंडळ मध्य प्रदेश सरकारच्या भोपाळ येथील मंत्रालयात मुख्यमंत्री कमलनाथ यांना भेटले. यावेळी छिंदवाडा जिल्ह्यातील मुलताईच्या लाव्हाघोगरी गावातून तोतलाडोह (पेंच) जलाशयात कन्हान नदीतून वाहणारे पावसाचे पाणी वळवून भूमिगत टनलद्वारे आणले जाणार आहे. या "कन्हान डायव्हर्शन प्रोजेक्‍ट'साठी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला जमीन उपलब्ध करून द्यावी याबाबतचे निवेदन दिले. 
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. मध्य प्रदेश जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गोपाल रेड्डी यांना करून आंतरराज्य मंडळाची बैठक घेण्यात यावी अशा सूचना केल्या. यावेळी नागपूर विभागाच्या सिंचन विभागाचे मुख्य अभियंता स्वामी, पेंचचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र तुरखेडे, चंद्रपाल चौकसे, सुनील रावत, नाना कंभाले, रोहित यादव, प्रकाश पटले उपस्थित होते. 

loading image
go to top