

Amravati News
sakal
अचलपूर : मेळघाटच्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात माता तथा बालमृत्यूचे तांडव सुरू असतानाच आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी तीन महिन्यांसाठी नियुक्त केलेल्या पीजी डॉक्टरांना सेवा न करताच तीन महिने सेवा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.