

A one-and-a-half-month-old girl died in Melghat, prompting a medical inquiry into the suspected cause.
esakal
चिखलदरा : मेळघाटातील दुर्गम भागात बालकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथे बुधवारी (ता. २१) अवघ्या दीड महिन्याच्या चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २६) समोर आली आहे. अधिरा सोनू कवडे (वय १.५ महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे.