Newborn Burnt 39 Times by Woman in Melghat : दहा दिवसांच्या चिमुकलीवर एका वृद्ध महिलेने आघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने गरम विळ्याने बाळाच्या पोटावर तब्बल ३९ चटके दिले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये सात दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.