Custard Apple : मेळघाटातील ऑरगॅनिक सीताफळ बाजारात

चिखलदरा तालुक्यातील काही गावांसह मेळघाटच्या डोंगर रांगांमधील सीताफळांना रानमेवा म्हणूनही ओळखले जाते.
Custard Apple
Custard Applesakal

चिखलदरा - तालुक्यातील काही गावांसह मेळघाटच्या डोंगर रांगांमधील सीताफळांना रानमेवा म्हणूनही ओळखले जाते. आता हा रानमेवा चिखलदरा, परतवाडा, अचलपूर व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. यापासून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात या सीताफळांची मोठी मागणी असते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती आणि कमी झालेला पाऊस, यामुळे उत्पादनात घट आली आहे. आवक कमी असल्याने सीताफळांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मेळघाटच्या दुर्गम भागातील सीताफळांना चांगला दर मिळत असला तरी उत्पादन कमी असल्याने कहीं खुशी, कही गम, अशी परिस्थिती आहे. चिखलदरा, अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात तसेच सीमावर्ती भागातील मध्य प्रदेशातील डोंगर रांगांमधील सीताफळांना राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते.

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, परसापूर, वडगाव आणि चिखलदरा तालुक्यातील मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात सीताफळांची झाडे आढळून येतात, यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत असतो. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेला असमाधानकारक पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सीताफळांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना सीताफळांना जादा दर देऊन खरेदी करावे लागत आहे.

आदिवासी बांधवांकडून सीताफळाच्या बियांचे संकलन करण्यात येत आहे. संकलित बिया आपापल्या शेताच्या बांधावर तसेच रस्त्याच्या कडेला लावून सीताफळाच्या झाडांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीताफळांचे भाव वाढणार

बाजारपेठांमध्ये सीताफळांना ७० रुपयांपासून तर १०० रुपये किलोपर्यंत फळाच्या आकारानुसार दर मिळत आहे. हे दर अजून वाढण्याची शक्यता आदिवासी बांधवांसह व्यापारी व्यक्त करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com