
मांजरखेड क.: मेळघाटातील गावागावात वाघाकडून होणारी शिकार हा ज्वलंत विषय आहे. स्थानिक नेते व गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार लागोपाठ झालेल्या शिकारीमागे (नरसंहार) मेळघाटबाहेरील वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्या भागात ह्या घटना झाल्या आहेत नेमक्या त्याच परिक्षेत्रात कॅटरीनाचा (कॉलरवाली) संचार आहे. हरिसाल, केसरपुर, तारुबांदा परिसरात झालेली शिकारीची पद्धत बघता या मागे कॅटरीना व तीन बछडे तर खोंगडा व कुलंगना परिसरात झालेल्या शिकारीत पंजाब किंवा त्याचा बछडा प्रिन्सच समावेश असावा. एकंदरीत या सर्व नरसंहाराची सुई 'पंजाब'च्या फॅमिलीवर केंद्रित होत आहे.