esakal | खारपाणपट्ट्यात केली कलिंगडाची लागवड; तोंगलाबादच्या काका-पुतण्याचा यशस्वी प्रयोग

बोलून बातमी शोधा

null

खारपाणपट्ट्यात केली कलिंगडाची लागवड; तोंगलाबादच्या काका-पुतण्याचा यशस्वी प्रयोग

sakal_logo
By
शशांक देशपांडे

दर्यापूर (जि. अमरावती) ः खारपाणपट्टा आहे इथे कुठले पीक घेता येत नाही, म्हणून हातावर हात धरून बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना उदाहरण ठरावे असे कार्य दर्यापूर तालुक्‍यातील तोंगलाबाद येथील शेतकऱ्याने करून दाखवले आहे. विदर्भात सर्वांत जास्त खारपाणपट्टा म्हणून दर्यापूर तालुका व आजूबाजूचा मोठा परिसर ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनीत खारे पाणी लागते, तथा जमिनीत क्षार आहेत. त्यामुळे येथे पाण्याची आवश्‍यकता असणारे पिके फार कमी प्रमाणात घेतले जाते.

या भागात कमी पाणी लागणारे एक किंवा दोन वार्षिक पिके घेतले जाऊ शकतात, अशी स्थिती आहे. यात जर कोणी या भागात आपल्या शेतात आणि ते पण उन्हाळ्यात कलिंगडाची यशस्वी लागवड केली असेल, तर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तालुक्‍यातील तोंगलाबाद येथील ज्ञानेश्वर जऊळकार व सोपान जऊळकार या काका-पुतण्याने आपल्या दोन एकर शेतात कलिंगडाची यशस्वी लागवड केली आहे. खारपाणपट्टा असल्याने प्रथमच ड्रीपर व मल्चिंग पेपर लावून दोन एकरात नव्या तंत्रज्ञान पद्धतीने ही कलिंगडाची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, ही भीती असताना मात्र चांगल्या प्रकारे कलिंगडचे पीक आले आहे. हे कलिंगड खाण्यासाठी उपयुक्त झाल्याने जऊळकार काका-पुतण्याच्या या कलिंगड लागवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शेतकऱ्यांनी खरपाणपट्ट्यावर विजय मिळविला असून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या येथील संशोधनाला आता नव्याने विचार करावा लागणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने येथील जमिनीत अनेक वेळा संशोधने केली. इसराईलची टीमसुद्धा येऊन गेली. अनेक निष्कर्ष मांडले गेले. मात्र कोणताही निष्कर्ष शेतकऱ्यांच्या हिताचा निघाला नाही. मात्र स्वबळावर शेती करून येथील खारपाणपट्ट्याला या शेतकऱ्यांनी हरविले आहे.

नव्या पद्धतीने लागवड व निगा

गावाला लागून असलेल्या दोन एकर शेतात ड्रिपर लावून ही लागवड केली. तणापासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी मल्चिंग पेपर लावून ही नव्या तंत्रज्ञान पद्धतीने मार्च महिन्यात लागवड करण्यात आली. चार वेळ जैविक फवारणी, खते वेळोवेळी देण्यात आले. दोन महिन्यांपासून स्वतः पिकाची राखण केली. आता विक्रीसाठी कलिंगडाची कापणी सुरू आहे, असे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर जऊळकार, सोपान जऊळकार यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ