पाण्याच्या टाकीत मिसळले विष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील वेकोलिच्या कामठी ओसीएम खान कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत रविवारी रात्री काही उपद्रवींनी विष मिसळविले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु चौकीदाराच्या सजगतमुळे या परिसातील पाच हजार लोकांचा जीव वाचला.

टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील वेकोलिच्या कामठी ओसीएम खान कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत रविवारी रात्री काही उपद्रवींनी विष मिसळविले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु चौकीदाराच्या सजगतमुळे या परिसातील पाच हजार लोकांचा जीव वाचला.
टेकाडी नजीकच्या कामठी ओसीएम वेकोली खान कामगार वसाहतींना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण संयत्रातील पाण्याच्या टाकीत रविवारच्या मध्यरात्री उपद्रवी इसमाने विष टाकले. यावेळी पाण्याच्या टाकीत सुमारे 4 लक्ष लीटर पाणी होते. काही व्यक्ती पाण्याच्या टाकीत काहीतरी मिसळवित असल्याचे येथे असलेल्या सुरक्षा रक्षक रामदीन प्रजापती याने पाहिले. मात्र, लोक आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे त्याने जीवाच्या भीतीने त्यांना हटकले नाही. मात्र, त्याने सकाळी पाणी पुरवठा न करता ही माहिती संबधित अधिकाऱ्यांना दिली.
सोमवारी सकाळी व्यवस्थापक रविकिरण मून, एस. टी. कपूर हे टाकीवर पोहचले. त्यांनी स्वत: पाणी पिऊन पाण्याचा तपशील घेतला. त्यापूर्वीच कर्मचारी बळीराम यादव आणि प्रेमसुंदर मोसेस व एजाज अहमद खान यांनी पाणी पिले. काही वेळातच या पाचही जणांच्या प्रकृतीत बिघाड आला. त्यांना वेकोलीच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून.घटनेचा तपशील घेण्यास वेकोलिचे व्यवस्थापक गोखले, तरुण कुमार त्रिवेदी, तालनकर, विनय कुमार, डॉ. मोइत्रा, शेगावकर, डॉ. तेजस्विनी यांनी घटना स्थळावर पोचून टाकीत असलेले पाणी बाहेर सोडण्याचे आदेश दिले. काही दिवस नळ योजना बंद ठेऊन वसाहतीत टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

शहनिशा करणे पडले महागात
चौकादाराने काही समाजकंटकांनी पाण्याच विष मिसवळल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र त्यावर कोणीच विश्‍वास बसला नाही. त्याची शहनिशा करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी पाणी पिले. मात्र त्यांना लगेच अस्वस्थ वाटू लागले. चौकीदाराची माहिती बरोबर असल्याचे लक्षात येताच पाणी पुरवठा थांबवण्यात आला.

मैदानात सोडले पाणी
पाण्यात विष असल्याचे सांगूनही काही अधिकंनी पाणी टेस्टिंग करू न घेण्यापेक्षा स्वतःवर त्याचा प्रयोग केला. यामुळे त्यांचा जीव धोक्‍यात आला आहे. यावरून अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. एका कंत्राटी कामगाराने देखील पाणी पिले. मात्र त्यास काहीच झाले नसल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. टाकीतील सर्व पाणी वकोली परिसरातील मैदानात सोडण्यात आले आहे. आरोपींनी पाण्यात काय मिसळविले याच्या तपासणीसाठी सॅम्पल पाठविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Methane poison in water tank