esakal | पंतप्रधान येणार, "सीएमआरएस'कडून मेट्रो डेपो, स्टेशनची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्यनगर : आयुक्त जनककुमार गर्ग यांच्याशी चर्चा करताना महा मेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर व इतर अधिकारी.

पंतप्रधान येणार, "सीएमआरएस'कडून मेट्रो डेपो, स्टेशनची पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळपासून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) कार्यालयाच्या पथकाने पाहणी केली. हिंगणा येथे मेट्रो डेपो तसेच लोकमान्यनगर स्टेशनला त्यांनी भेट देऊन मेट्रो अधिकाऱ्यांसोबत सुविधांबाबत चर्चा केली.
हिंगणा मार्गावरील मेट्रो प्रकल्पाला शनिवारी (ता. 7) हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण तपासण्या पूर्ण करण्यात येत आहे. मेट्रोच्या विविध चाचण्यासाठी आयुक्त जनककुमार गर्ग यांच्या नेतृत्वात के. एल. पुर्थी, विवेक वाजपेयी, ऋषभकुमार यांचा समावेश असलेले पथक मंगळवारी आले. तीनदिवसीय दौऱ्यातील पहिल्या दिवशी पथकाने हिंगणा येथील मेट्रो डेपो तसेच लोकमान्यनगर स्टेशनची पाहणी केली. हिंगणा डेपो येथे रोलिंग स्टॉक रूम, डेली रिपोर्टस, ट्रेन व्हाल मशीन, डेपो कंट्रोल रूम, मेट्रो रूट मॅप, सिग्नलिंग प्रणाली आदींची पाहणी केली.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सीएमआरएस अधिकाऱ्यांना प्रकल्पाची माहिती दिली. "सीएमआरएस' अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केले. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर व सुरक्षा उपकरणांची तपासणी केली. डेपोत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी जनककुमार गर्ग यांनी संवाद साधला. हिंगणा डेपो येथे "सीएमआरएस' अधिकाऱ्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांची भेट घेतली. प्रवासी सेवेनिमित्त आवश्‍यक सोयी सुविधांचा आढावा अधिकाऱ्यांनी घेतला. लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन येथे सुविधांची पाहणीही अधिकाऱ्यांनी केली.

loading image
go to top