esakal | मिक्‍कीची गुन्हेगारी जगताची सुरुवात सदरमधून
sakal

बोलून बातमी शोधा

मिक्‍कीची गुन्हेगारी जगताची सुरुवात सदरमधून

मिक्‍कीची गुन्हेगारी जगताची सुरुवात सदरमधून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : कूलर व्यावसायी ऋषी खोसला हत्याकांडाचा मास्टरमाइंड मिक्‍की बक्षी आणि गिरीश दासरवारला पोलिसांनी अटक केली असून आणखी दोन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्या युवकांची चौकशी सुरू असून एक पथक अन्य आरोपींच्या शोधासाठी अन्य राज्यात पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिक्‍की बक्षी हा केंद्रीय राखीव पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत होता. त्याची पहिलीच तैनाती गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भाग भामरागड परिसरात होती. जंगलात ड्यूटीवर असताना नक्षलवाद्यांशी चकमक झाली आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला होता. त्यानंतर मिक्‍की सुटी घेऊन नागपूरला परत आला आणि पुन्हा ड्यूटीवर गेलाच नव्हता. यादरम्यान मिक्‍कीची ऋषी खोसला आणि सुनील भाटीया या दोघांशी मैत्री झाली. मिक्‍कीने सदरमधील रेसिडेन्सी रोडवर यूथ फोर्स नावाने सुरक्षा गार्ड एजन्सी सुरू केली होती. तसेच ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसोबत जुळला होता. हाणामारी करण्यासाठी त्याचे कार्यकर्ते तो भाड्याने देत होता.
loading image
go to top