Middle East War Hits Vidarbha Rice Export
esakal
नागपूर : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाचा मोठा फटका विदर्भातील तांदूळ निर्यातीला बसला आहे. विदर्भातील सुप्रसिद्ध आंबेमोहर आणि बासमती तांदूळ सध्या बंदरांवरच अडकून पडला आहे. आखाती देशांकडे जाणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे. दर्जेदार तांदळाच्या किमतीत किलोमागे १० ते २० रुपयांची घट झाली आहे. प्रीमियम तांदळाच्या शौकिनांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी व्यापारी आणि निर्यातदारांच्या चिंतेत मात्र मोठी भर पडली आहे.