esakal | महिला व बालकल्याण मंत्र्यांनी ताफा थांबवून केली विचारपूस अन् जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

yashomati.

मंत्री यशोमती ठाकूर या सकाळी प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत डॉक्टरांना भेटायला गेल्या असता तेथून घरी परतताना रस्त्याने काही युवक पायी चालले होते. तेवढ्यात मंत्री यशोमती ठाकूर यांचा ताफा त्याच दिशेने जात असताना त्यांनी आपला ताफ़ा थांबविला व त्या युवकांना विचारले, कुठे निघालात मुलांनो ?कुठून आलात तुम्ही? तुम्ही जेवण वगैरे केले का? असे प्रश्न ऐकताच ते सगळे युवक थक्क झाले.

महिला व बालकल्याण मंत्र्यांनी ताफा थांबवून केली विचारपूस अन् जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

sakal_logo
By
अमर घटारे

अमरावती : कुठे निघालात मुलांनो? कुठून आले तुम्ही? जेवण वगैरे केलं का? असे प्रश्न विचारणारा बहुदा परिवारातला माणूस असतो. पण मात्र असा प्रश्न  रस्त्याने पायी जाणाऱ्या युवकांना अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क रस्त्यावर आपला ताफा थांबवून विचारला.
मंत्री यशोमती ठाकूर या सकाळी प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत डॉक्टरांना भेटायला गेल्या असता तेथून घरी परतताना रस्त्याने काही युवक पायी चालले होते. तेवढ्यात मंत्री यशोमती ठाकूर यांचा ताफा त्याच दिशेने जात असताना त्यांनी आपला ताफ़ा थांबविला व त्या युवकांना विचारले, कुठे निघालात मुलांनो ?कुठून आलात तुम्ही? तुम्ही जेवण वगैरे केले का? असे प्रश्न ऐकताच ते सगळे युवक थक्क झाले. आम्ही जळगाव वरून आलो आणि उत्तर प्रदेशला पायी जात आहोत,असे सांगताच मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्या मुलांची माहिती दिली. त्यांची जेवणाची व्यवस्था करून द्या व या दोन दिवसात त्यांची जाण्याची सोय करा असे सांगितल्यावर त्या सर्व तरुणांचे चेहरे प्रफुल्लित झाले. त्याच आनंदलेल्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी त्यांनी यशोमती ठाकूर यांना पायी चालताना आमच्या चपला तुटल्या. आमच्या पायाला फोड आले असे सांगितल्यावर ठाकूर यांनी तहसीलदाराचा नंबर थेट त्या युवकांना दिला. तुम्ही दोन दिवस इथे थांबा. तुमची व्यवस्था आमचे प्रशासन करेल असे सांगितल्यावर या युवकांच्या चेहऱ्यावर  आनंद दिसून आला.

सविस्तर वाचा - हुश्श! यंदाचा उन्हाळा गाठणार म्हणे पा-याचा   उच्चांक
    अमरावती जिल्ह्यातील कोटा येथे असलेले अनेक विद्यार्थी अमरावती शहरात प्रशासनाच्या मदतीने आणण्यात आले. त्या सर्वांना अमरावती विद्यापीठात कॉरन्टाईन केले आहे. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहु नये, ज्यांना प्रशासनाची मदत लागेल त्यांनी प्रशासनासोबत व वेळ पडल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला केले आहे..