'कोणाचा नवरा अन् कोणाचा मुलगा दारू पितो मला माहिती आहे'

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiware sakal
Updated on

नागपूर : चंद्रपूर येथील दारूबंदी ही गुरुवारी उठवण्यात (lift liquor banned in chandrapur) आली. चंद्रपुरात गुन्हेगारी वाढल्यामुळे ही दारूबंदी उठविल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) यांनी सांगितले. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. त्यालाच आज विजय वडेट्टीवारांनी उत्तर दिले आहे. (minister vijay wadettiwar criticized people who support liquor banned in chandrapur)

'दारूबंदीमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांचा डुप्लिकेट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आणि जे दारूबंदीचं समर्थन करणाऱ्यांनी आधी आपलं घर बघावं. कोणाचा नवरा आणि कोणाचा मुलगा दारू पितो हे मला माहित आहे. फुकट समाजसेवेचा बुरखा बांधून टीका करू नये. उगाच दारूबंदीचा आव आणू नये, असा अप्रत्यक्ष टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Vijay Wadettiwar
चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न

सध्याच या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही. आता फक्त कॅबिनेटचा निर्णय झाला. त्यानंतर जीआर काढून येत्या एक ते दोन महिन्यात निर्णय होईल, असे वडेट्टीवारांनी सांगितले. तसेच या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये वास्तविकता मांडू. त्यानुसार न्यायालयातही ते टीकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जगात दारूबंदी कुठेही यशस्वी झालेली नाही. देशातील इतर राज्यातही दारूबंदीमुळे वाईट परिस्थिती आहे. चोरट्या मार्गानं दारू विकली जात आहे. चंद्रपूरमध्ये सर्व पोलिस या दारूबंदीच्या कामात गुंतले होते. बाकी क्राइम सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. तब्बल ४० हजार गुन्हे दाखल झाले आहेत. ही गंभीर बाब होती. त्यामुळे राज्य सरकारने दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय, अभ्यास करून शासनास शिफारस प्राप्त करण्यासाठी सेवानिवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. समितीने महिनाभरात राज्य सरकारला अहवाल सादर केला. त्यानंतर दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

दारूबंदीवर अभय बंग यांची टीका -

दारूबंदीसाठी जिल्ह्यातील एक लाख महिलांनी आंदोलन केले. ५८५ ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेचा ठरावामुळे सरकारने सहा वर्षांपूर्वी दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दारूबंदीची अंमलबजावणी पुरेसी झाली नाही हेही तितकेच खरे आहे. दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला व आता सरकारचा निर्णय करवून घेतला. राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातली प्रभावी दारूबंदी, बिहारमधील दारूबंदीपासून शिकून चंद्रपूरमध्ये देखील यशस्वी दारू नियंत्रण करायला हवे. दारूबंदी उठविणे ही अयशस्वी सरकारची कबुली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी 'असफल' झाली असे निमित्त देऊन दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अयोग्य व दुर्दैवी निर्णय आहे, असे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com