Chandrapur Earthquake: वरोरा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केलची नोंद, नुकसान नाही
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ३.२ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप नोंदवला गेला. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही. तज्ज्ञांच्या मते, खाणींमध्ये पाणी शिरल्यामुळे हा भूकंप झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात गुरुवार (ता. २५) भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाचे केंद्र वरोरा असून त्याची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती भूकंप ॲपद्वारे प्राप्त झाली.