मोताळा (जि. बुलडाणा) - एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर मातृत्व लादण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध बुधवारी (ता. २७) गुन्हा दाखल केला आहे..अकोला जिल्ह्यामधील एका गावातील माहेर असलेल्या १७ वर्षे ७ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने बाल गृह बुलडाणा येथे असताना मंगळवारी (ता. २६) पोलिसांकडे जबाब दिला की, दिपक जानकीराम बाजोडे, प्रभाकर जानकीराम बाजोडे, सारीका प्रभाकर बाजोडे, योगीता गणेश बाजोडे, ज्ञानेश्वर सापुर्डा वसतकार यांनी नांदुरा तालुक्यातील एका गावातील विठ्ठल महादेव खोंदले याच्यासोबत तिचा विवाह जबरदस्तीने लावून दिला होता..विवाह झाल्यानंतर विठ्ठल खोंदले याने पीडितेसोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. सद्यस्थितीत तिला अडीच महिन्यांची मुलगी आहे, असे जबाबात नमूद आहे. यावरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राजेंद्र कपले करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.