esakal | घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

minor girl physical abused in ghuggus of chandrapur

आमराई वार्डात टिपले कुटुंबीय राहते. घरातील कामे करण्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील अल्पवयीन मुलगी आणली. तिला प्रतीमाह 3 हजार रुपये देण्याचे ठरले. मागील दोन महिन्यांपासून ती अल्पवयीन मुलगी टिपले यांच्या घरी काम करीत होती

घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल

sakal_logo
By
मनोज कनकम

घुग्घुस (चंद्रपूर): घरकाम करण्यासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीवर बापलेकाने अत्याचार केला. ही घटना घुग्घुस येथे मंगळवारी (ता. 3) उघडकीस आली. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी बापलेकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. महादेव टिपले (वय 63) व स्वप्नील टिपले (वय 32), असे अटकेतील बापलेकाची नावे आहेत.

हेही वाचा - सततच्या पावसामुळे सोयाबीनला शेंगा फुटल्याच नाही, मग निराश शेतकऱ्याने पिकात फिरवला...

आमराई वार्डात टिपले कुटुंबीय राहते. घरातील कामे करण्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील अल्पवयीन मुलगी आणली. तिला प्रतीमाह 3 हजार रुपये देण्याचे ठरले. मागील दोन महिन्यांपासून ती अल्पवयीन मुलगी टिपले यांच्या घरी काम करीत होती. दरम्यान, या मुलीवर वडील महादेव टिपले आणि मुलगा स्वप्नील टिपले या बापलेकाची वाईट नजर होती.  

हेही वाचा - एका चुकीमुळे कलावंताच्या आयुष्यात झाला अंधार, २० वर्षांपासून लहानशा 'डार्करुमध्ये' जगतोय...

संधी साधून या बापलेकानी त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकाराने भांबावलेल्या मुलीने घुग्घुस पोलिस ठाणे गाठून टिपले बापलेकाविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बापलेकाना अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंवि 376, पाक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागपुरे करीत आहे.