
मारेगाव तालुक्यात झालेल्या सततच्या पावसाने कापूस व सोयाबीन या सर्वाधिक लावगड क्षेत्र असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन पिकाला कोंब फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले. निराशा व संतापाच्या भरात एका शेतकऱ्याने शेतात उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून ते नष्ट केले.
मारेगाव (जि. यवतमाळ) : सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या पाचही एकरातील सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यामुळे तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील निराश झालेल्या संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याने पाच एकरातील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवून घामाने पिकविलेल्या पिकाला उद्ध्वस्त केले.
अवश्य वाचा : थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, दिवाळी हुडहुडी
यंदा मारेगाव तालुक्यात झालेल्या सततच्या पावसाने कापूस व सोयाबीन या सर्वाधिक लावगड क्षेत्र असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोरी (गदाजी) येथील संभाजी बेंडे यांच्या पाच एकरात सोयाबीन पीक होते.
मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने तालुक्यात जोरदार व सातत्यपूर्ण हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला कोंब फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले. निराशा व संतापाच्या भरात या शेतकऱ्याने शेतात उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून ते नष्ट केले.
जाणून घ्या : नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव
मनावर दगड ठेवला
पाच एकरात सोयाबीन पेरले होते. मात्र अति पावसामुळे शेंगा भरल्याच नव्हत्या. त्यामुळे मनावर दगड ठेवून पिकावर ट्रॅक्टर फिरविला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. आता रब्बी हंगामाची तयारी करतो आहे. बघतो यातून तरी काही फायदा होतो की नाही.
- संभाजी बेंडे, शेतकरी.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)