वलगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २४ तासातील दुसरी घटना

संतोष ताकपिरे
Saturday, 24 October 2020

पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी योगेश चिंतामण खंडारे (वय 25) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. योगेश काही दिवसांपासून पीडितेच्या मागे लागला होता. तो सतत तिचा पाठलाग करत होता.

अमरावती : वलगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच गेल्या २४ तासात या परिसरातील ही दुसरी अत्याचारी घटना आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी योगेश चिंतामण खंडारे (वय 25) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. योगेश काही दिवसांपासून पीडितेच्या मागे लागला होता. तो सतत तिचा पाठलाग करत होता. सुरुवातील तिला फिरण्याचे आमिष दाखवून वलगावातच घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी ही शाळेत जात असतानाही तो तिच्या मागावर असायचा. रस्त्यात अडवून तिला मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. सातत्याने सुरू असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे पीडिता घाबरली. तिने अत्याचारासंदर्भात कुटुंबातील कुणालाही माहिती दिली नाही. योगेशने सुद्धा तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर योगेशने पीडितेच्या घरासमोरुन चकरा मारायला सुरुवात केली. ही बाब पीडितेच्या पालकांच्या निदर्शनास आल्यामुळे तिला दुसऱ्या तालुक्‍यात नातेवाइकांकडे पाठविले. योगेशने पीडित मुलीच्या नातेवाइकांचेही गाव गाठून तेथेही त्रास देण्याचा प्रकार सुरूच ठेवला. 

हेही वाचा - डोक्यावर पदर, ना पाहुण्यांच्या बैठकीत जाण्याची मुभा; तरीही देशमुख घराण्यातील महिला सायकल दुरुस्ती...

अखेर पीडितेने पालकांसह वलगाव पोलीस ठाणे गाठले. वैद्यकीय तपासणीअंती पोलिसांनी संशयित योगेश खंडारेविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला गुरुवारी (ता. 22) रात्री अटक केली. शुक्रवारी (ता. 23) योगेशला तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हजर केले. यापूर्वी वलगाव हद्दीतील सोपान गुडधे विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, सोपान अद्यापही फरार आहे.

हेही वाचा - सुमठाण्याच्या आधुनिक रोपवाटिकेत अंधाराचे साम्राज्य, वन्यप्राण्यांचा वावर; सांगा,...

पीडित अल्पवयीन मुलगी घाबरल्याने तक्रार देण्यास विलंब झाला. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने पुढील प्रक्रिया पार पाडली.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, नांदगावपेठ ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl physically abused in walgaon of amravati