esakal | सुमठाण्याच्या आधुनिक रोपवाटिकेत अंधाराचे साम्राज्य, वन्यप्राण्यांचा वावर; सांगा, मजुरांनी कशी काढावी रात्र?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सुमठाणा येथील रोपवाटिकेतील सौर दिवे बंद असल्याने मजुरांना रात्रीच्या सुमाराला वन्यजीवांपासून धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी रोपवाटिकेत सात सौरदिवे लावण्यात आले होते. मात्र, त्यापैकी पाच दिवे सध्या पूर्णतः बंद पडली आहेत. वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. दहशतीच्या सावटात रात्रपाळीत काम करणाऱ्या वनमजुरावर रात्र काढण्याची वेळ आली आहे

सुमठाण्याच्या आधुनिक रोपवाटिकेत अंधाराचे साम्राज्य, वन्यप्राण्यांचा वावर; सांगा, मजुरांनी कशी काढावी रात्र?

sakal_logo
By
मनोज आत्राम

चुनाळा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील सुमठाणा येथील आधुनिक रोपवाटिकेत लावण्यात आलेले सौरदिवे मागील काही वर्षांपासून बंद स्थितीत आहेत. त्यामुळे रात्रपाळीत काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांना काळोखात वन्यप्राण्यांच्या दहशतीत रात्र काढावी लागत आहे. या बंद असलेल्या लाइटमुले मजुरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाची सुमठाणा कक्षात जवळपास दोन हेक्‍टर परिसरात आधुनिक रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत भोकर, शामल, कडुनिंब, जांभूळ, सीताफळ, बाभूळ, सालई, चिंच आदीसह अनेक प्रजातीचे झाडे तयार केली आहे. या रोपवाटिकेत देखरेखीसाठी रात्रपाळीत मजूर थांबतात. रोपवाटिका चारही बाजूंनी जंगलानी वेढलेली आहे. या परिसरात हिंस्र श्‍वापदांचा नेहमीच वावर असतो.

अवश्य वाचा : आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

अंधारात रात्रपाळीत काम करतात मजूर

त्यामुळे मजुरांना रात्रीच्या सुमाराला वन्यजीवांपासून धोका होऊ नये, यासाठी काही वर्षांपूर्वी रोपवाटिकेत सात सौरदिवे लावण्यात आले. मात्र, त्यापैकी पाच दिवे पूर्णतः बंद पडली आहेत. रोपवाटिकेचा परिसर अतिसंवेदनशील आहे. वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. दहशतीच्या सावटात रात्रपाळीत काम करणाऱ्या वनमजुरावर रात्र काढण्याची वेळ आली आहे.

राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ

या आधुनिक रोपवाटिके सभोवताल काटेरी कुंपण लावण्यात आले होते. मात्र सुरक्षेसाठी लावण्यात आलेले काटेरी तारेचे कुंपण जागोजागी तुटलेले आहे. त्यामुळे वन्यजीव येथे सहज येऊ शकतात. त्यामुळे रात्रपाळीत काम करणाऱ्या मजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांपासून राजुरा तालुक्‍यात आरटी-१ वाघाचा धुमाकूळ सुरू आहे.

जाणून घ्या : गेल्या दहा वर्षांत वाघ, बिबटाच्या हल्ल्यात तब्बल १०१ लोकांचे बळी; मानवी हस्तक्षेपामुळे संघर्ष   


वाटिकेतील सौरदिवे सुरू करा

रोपवाटिका ही कक्ष क्र. १५३ या जंगलव्याप्त भागाला लागून आहे. या सभोवताल रानडुकरे, अस्वल, वाघ या सारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदस्थितीत असलेल्या सौरदिव्यांचा समस्येकडे लक्ष द्यावे, तसेच सर दिवे पूर्वत सुरू करावे, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)