Bhandara Minor Girl Video Viral Case
esakal
तुमसर (जि. भंडारा) : प्रेमसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. नंतर त्या व्हिडिओच्या बळावर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली. मुलीने या नराधमांना कडाडून विरोध करताच, त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. याप्रकरणात गोबरवाही पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध ‘पोक्सो’ आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.