Mirza Express Dr. Mirza Rafi Ahmed Beg Passes Away
esakal
विदर्भ
'मिर्झा एक्सप्रेस' काळाच्या पडद्याआड; हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन; अमरावतीत होणार अंत्यसंस्कार...
Dr. Mirza Rafi Ahmed Beg Passes Away : 'मिर्झा एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. मिर्झा याचं वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली. राजधानी दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे.
सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. 'मिर्झा एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. मिर्झा हे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या गावचे होते. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात त्याचं वास्तव्यं होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, मुलगी महाजबी व हुमा असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
