esakal | बंधारा बांधकामात गैरव्यवहार?
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

बंधारा बांधकामात गैरव्यवहार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील हुळुकदुमा येथे 21 लाख रुपये खर्च बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी कंत्राटदार व अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सरपंचासह ग्रामसभा अध्यक्ष व सचिवाने केला आहे.
हुळुकदुमा गावात कोणत्याही प्रकारची सिंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील बारमाही वाहणाऱ्या नाल्यावर मागील पाच वर्षांत एकूण चार बंधारे बांधण्यात आले. त्यापैकी सिंचन विभागाने केवळ चार महिन्यांपूर्वी बांधलेले बांधलेले दोन्ही बंधारे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. या दोन्ही बंधाऱ्यांसाठी खर्च करण्यात आलेले 21 लाख 45 हजार रुपये पाण्यात गेले. हे बंधारे मृदा व जलसंधारण विभाग, चंद्रपूरच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बांधण्यात आले होते. यातील एका बंधाऱ्याच्या बांधकामाची किंमत सुमारे 11 लाख होती.
बंधारा वाहून गेल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकताच कंत्राटदार बब्बू मस्तान, कुरखेडा व मृदा संधारण विभागाचे कनिष्ठ अभियंता पेंदोरकर, सरपंच कल्पना नैताम, ग्रामसभा अध्यक्ष बलुराम हिचामी, सचिव नरेंद्र सलामे यांच्यासह पत्रकारांनी मोक्का पाहणी केली. बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 10 टक्के निधी राखीव असतो. दिवाळीनंतर पाऊस कमी झाल्यावर या निधीतून दुरुस्तीचे काम करणार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. मात्र एवढ्या कमी पैशात बंधारा दुरुस्त कसा होणार? ठेकेदार व अभियंता हे खोटे बोलत आहेत. त्यांनी शासनाच्या पैशाचा अपव्यय केला आहे. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सरपंच कल्पना नैताम, नरेंद्र सलामे व बलुराम हिचामी यांनी केली आहे.

loading image
go to top