esakal | संघ, भाजपचे विधानसभेचे मिशन "फायनल'
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

संघ, भाजपचे विधानसभेचे मिशन "फायनल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी संघपरिवाराने कंबर कसली आहे. संघपरिवारातील अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी दिवसभर थेट शहराबाहेर एकत्र बसून चिंतन केले. या चिंतनातून विधानसभेचे मिशन "फायनल' झाल्याची बैठकीनंतर चर्चा होती.
संघ परिवारातील संघटनांचा प्रशिक्षणवर्ग शनिवारी रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक स्मृती मंदिर परिसरात झाला होता. या वर्गाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व संघटन सचिव विजय पुराणिक यांच्यासह बडे नेते हजर होते. रविवारीही परिवारातील विविध संघटनांच्या केवळ नागपूर महानगरातील पदाधिकाऱ्यांची समन्वय चिंतन बैठक थेट शहराबाहेर असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात आयोजित केली होती. विशेष म्हणजे या बैठकीला संघपरिवारातील संघटनांचे फक्त पदाधिकारी होते. मात्र, संघाचे बहुतांश पदाधिकारी व भाजपचे आमदार, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा भाजपच सत्तेवर राहावा याकरिता संघपरिवारील सदस्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिताच ही समन्वय बैठक बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. मुळात अशा समन्वय बैठक, चिंतन बैठक संघपरिवारातील पदाधिकाऱ्यांना किंवा भाजपच्या अधिकाऱ्यांना काही नवीन नाही. दोन्ही व्यवस्थापनात योग्य तो संवाद राहावा, यासाठी अशा समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते, असे एका स्वयंसेवकाने सांगितले. संघाकडून जनजागरणाच्या नावे राबविण्यात आलेल्या योजनांबाबतची माहिती या बैठकीत दिल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र, असे असले तरी या बैठकीचा एक विषय आगामी विधानसभा निवडणूक हा होता, असे कळते.  

loading image
go to top