
अमरावती: संत गाडेगबाबा अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून बुलडाणा व वाशीम जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केली आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे दोन्ही जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याचा त्यांचा दावा आहे.