esakal | विविध मागण्यांसाठी आमदार रवी राणा चढले विधिमंडळाच्या इमारतीवर
sakal

बोलून बातमी शोधा

विविध मागण्यांसाठी आमदार रवी राणा चढले विधिमंडळाच्या इमारतीवर

विविध मागण्यांसाठी आमदार रवी राणा चढले विधिमंडळाच्या इमारतीवर

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

अमरावती : विधिमंडळाच्या अधिवेशनात (Legislative Assembly) शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, बेरोजगार, मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अशा विविध विषयांवर चर्चा व्हावी, यासाठी आमदार रवी राणा यांनी मंगळवारी (ता. ६) विधिमंडळाच्या इमारतीवर चढून मागण्यांचे फलक (Climb the building and flash the billboards) झळकविले. राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर न्याय मिळवून देण्यासाठी १५ दिवस अधिवेशन चालवून चर्चा करण्याची मागणी आमदार राणा (MLA Ravi Rana) यांनी यावेळी केली. (MLA-Ravi-Rana-climbed-the-Legislature-building)

राज्यातील जनतेच्या समस्यांशी सरकारला काही घेणेदेणे नाही. दोन दिवस अधिवेशन चालवून सरकार पळ काढत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. मंगळवारी आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन पत्रातील नमूद विषयांवर सभागृहात चर्चा करून त्या मागण्या सरकारकडून मंजूर करण्याची मागणी केली होती. वेळेवर पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे अधिवेशनात चर्चा करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

सोबतच बोगस बियाणे घोटाळाप्रकरणाची ईडी आणि सीबीआयच्या माध्यमाने चौकशी करण्यात यावी, कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झालेला आहे. त्यामुळे अधिवेशनात चर्चा करून या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा परिस्थितीत विदर्भातील शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी आदेश जारी करण्यात यावे, अशी मागणी आमदार राणा यांनी केली. राज्यात गंभीर स्वरूपाचे प्रश्न असल्याने त्यावर दोन दिवसांत चर्चा होणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने किमान १५ दिवस अधिवेशन सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.

(MLA-Ravi-Rana-climbed-the-Legislature-building)

loading image