नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी सर्वपक्षीय आजी - माजी आमदार एकवटले

MLAs of all parties are to gather for arresting of scary tiger
MLAs of all parties are to gather for arresting of scary tiger

राजुरा (जि. चंद्रपूर) : मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्र मध्ये मागील बावीस महिन्यापासून नरभक्षी वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे.  वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या  निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट आहे व शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. त्यामुळे जनतेत प्रचंड रोष वाढला आहे . वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा किंवा ठार मारा यासाठी आता सर्वपक्षीय आजी- माजी आमदार व शेतकरी एकवटले आहेत.

आमदार सुभाष धोटे, माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप ,माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार एडवोकेट संजय धोटे, परिसरातील शेतकऱ्यांनी नरभक्षी वाघाला ठार करण्याची मागणी केलेली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे.  यामुळे वन विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव वाढलेला आहे. 

वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी वाघ पकडण्याच्या मोहिमेला गती दिलेली आहे. तत्पूर्वी मागील एक वर्षाच्या कालखंडात या मोहिमेला थंडबस्त्यात ठेवण्याचे काम येथील अधिकाऱ्यांनीच केले होते. वनविभागाने फारसे या घटनेला फारसे गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नाहक जीव गेले आहेत.

राजुरा व वीरुर वनपरिक्षेत्र मध्ये आतापर्यंत दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी वाघाच्या हल्ल्यात गेलेला आहे. या प्रकरणात राजूरा व विरुर स्टेशन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे जीव गेले आहे असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या दोनही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. 

दिनांक 5 ऑक्टोबर ला वाघाने दहावा बळी घेतला त्यानंतर जनप्रक्षोभ वाढलेला आहे.  वनविभागाच्या अकार्यक्षम कामगिरीमुळे नागरिकाने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे  परिसरामध्ये प्रचंड दहशत आहे. शेतकरी शेतावर जाण्यासाठी घाबरत आहेत. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे शेतकर्‍यांना नियमित शेतावर शेतावर जावे लागते. या क्षेत्रात कापूस, धान, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात लागवड  होते. वाघाच्या दहशतीत शेतकरी घाबरलेल्या स्थितीत आहेत. जीव मुठीत घेऊन कामे करीत आहेत. 

वाघाला जेरबंद करण्यासाठी  काही दिवसापासून वन विभागाने टीम तयार केलेल्या आहेत. जवळपास 160 कॅमेरे ,200 कर्मचारी ,2 शार्प शूटर एवढा फौजफाटा घेऊन वनविभाग वाघाच्या हालचालीवर पाळत ठेवून आहे. मात्र वन विभागाच्या तावडीत नरभक्षी वाघ आलेला नाही. मागील दोन ते तीन महिन्यापासून सुरू असलेल्या मोहिमेत वन विभागाला स्पेशल अपयश आलेले आहे. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता नागरिकांच्या जीवाशी खेळ नको म्हणून सर्वच पक्षातील नेते व जनता एकवटली आहे.


वन विभागाची मोहीम दिशाभूल करणारी आहे. वनविभागाने केवळ कागदोपत्री अहवाल सादर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आणि अधिकारी निश्चिंत आहेत. नरभक्षी वाघाला तात्काळ ठार मारावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
सुदर्शन निमकर ,
माजी आमदार राजुरा..


वनविभागाने नरभक्षी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा. वाघापेक्षा नागरिकांच्या जीव महत्त्वाचा आहे. वाघाला ठार मारण्याचे आदेश शासनाने द्यावे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. याबाबत मुख्यमंत्री व प्रधान वन सचिव यांच्याशी भेट घेण्यात येईल.
आमदार सुभाष धोटे, 
राजुरा..

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com