esakal | नागपुरात फिरती कोविड चाचणी प्रयोगशाळा सुरू; नितीन गडकरींच्या हस्ते उद्‍घाटन; २४ तासाच देणार अहवाल

बोलून बातमी शोधा

null

नागपुरात फिरती कोविड चाचणी प्रयोगशाळा सुरू; नितीन गडकरींच्या हस्ते उद्‍घाटन; २४ तासाच देणार अहवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः राज्य शासन तसेच नागपूर महानगरपालिकेच्यावतीने नागपुरात स्पाइस हेल्थच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून २४ तासांच्या आत चाचणी अहवाल रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार करणे शक्य होतील आणि करोणा विषाणूचा संसर्ग टाळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले.

हेही वाचा: 'केंद्र सरकारची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत; राज्य सरकारचे आरोप चुकीचे' : देवेंद्र फडणवीस

फिरत्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण सुरेश भट सभागृहामध्ये गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी हा १२ तास करण्याचासुद्धा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सदर अहवाल हा मोबाईल वरच मिळणार असल्यामुळे प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही . नागपूर शहरासोबतच पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नमुन्यांची चाचणीसुद्धा येथील प्रयोगशाळेत होणार आहे. या लॅबद्वारे ४२५ रुपयात नमुने तपासले जाणार असून कंटनेरच्या आकारामध्ये असलेल्या या फिरत्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ चमू कार्यरत आहे.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

प्रतिदिन तीन हजार लोकांची टेस्ट केली जाणार असून त्याचा अहवाल २४ तासात मिळणार आहे. ही लॅब नागपूरकरांच्या सेवेत आजपासून दाखल झाली आहे. प्रयोगशाळेच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त बी. राधाकृष्णन , स्पाईस हेल्थचे संचालक अजय सिंग , स्थानिक लोकप्रतिनिधी , नगरसेवक उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ