esakal | ड्रग्ज तस्करीत नागपूरची "मॉडेल'
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रग्ज तस्करीत नागपूरची "मॉडेल'

ड्रग्ज तस्करीत नागपूरची "मॉडेल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : मुंबईतून नागपुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या "मॉडेल'सह दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. शिवानी नंदू बानाईत (वय 20, रा. उदयनगर, गोलबा रेसिडेन्सी, हुडकेश्‍वर) असे मॉडेलचे तर बग्गा उर्फ बंटी शेरूअहमद खान (वय 27, रा. न्यू सूरजनगर, वाठोडा) असे साथिदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवाच्या दरम्यान नागपुरात ड्रग्जची खेप येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त नीलेश भरणे आणि उपायुक्‍त गजानन राजमाने यांना मिळाली. त्यांनी "एनडीपीएस'चे राजेंद्र निकम यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सीताबर्डीतील बोले पेट्रोल पम्पजवळील बस स्टॉपच्या समोर पोलिस कर्मचारी दबा धरून बसले. एका ट्रॅव्हल्समधून एक युवक व युवती खाली उतरले. युवकाच्या हातात एक पिशवी होती. दोघेही काही अंतर चालत गेल्यानंतर ते थांबले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. बग्गा ऊर्फ बंटी शेख आणि शिवानी बानाईत असे नाव त्यांनी पोलिसांना सांगितले. बग्गाची अंगझडती घेतली असता बॅगमध्ये 20 ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ तर शिवानीच्या पर्समधून 5 ग्रॅम एमडी आढळून आला. दोघांनीही गुन्हे शाखेत आणण्यात आले. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी खाक्‍या दाखवताच दोघांनीही मुंबईतून ड्रग्ज आणल्याची कबुली दिली. शिवानी आणि बग्गावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.
मॉडेल ते ड्रग्ज तस्कर
शिवानी बानाईत हिने नागपूर आणि मुंबईतील अनेक सौंदर्य स्पर्धेत स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. तसेच तिने मुंबईत बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावर नशीब अजमावले आहे. तिने मॉडेलिंग केली असून काही सौंदर्य प्रसाधनासाठी फोटो शूट केल्याची माहिती आहे. मॉडेलिंगपेक्षा ड्रग्ज तस्करीत जास्त पैसा असल्यामुळे झटपट पैसा कमविण्याच्या नादात ती गुन्हेगारी जगतात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बग्गा सराईत "पॅडलर'
बग्गा शेख हा गेल्या अनेक वर्षांपासून अंमली पदार्थ तस्करीशी जुळलेला आहे. त्याच्यावर यापूर्वीच अंमली पदार्थ तस्करी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच आणखी गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्या गुन्ह्यातून तो फरार झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पुन्हा ड्रग्ज पॅडलर म्हणून काम करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
loading image
go to top