

Mohan Bhagwat
esakal
खामगाव: समाजपरिवर्तन केवळ भाषणांनी घडत नाही तर सकारात्मक विचार आणि प्रत्यक्ष कृतीतून परिवर्तनाची प्रक्रिया पुढे जाते. चांगल्या कामाची कधी जाहिरात करण्याची आवश्यकता नसते. त्याचा परिणाम समाजात दिसतो आणि ते काम पुढे जाते व वाढत राहते. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर केवळ अपेक्षा व्यक्त न करता प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.