Amravati: शेवटचा दिवस मनसोक्त जगले! आई अन् मुलाने तलावात उडी घेत जीवन संपवले

Latest Marathi News: लक्ष्मण लोणारकर हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.
mom and son in amravati ended their life in chhatri talav
mom and son in amravati ended their life in chhatri talav sakal
Updated on: 

Chatri Talav: छत्रीतलाव परिसरात मुलगा व आईने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. २२) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

राजापेठ पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शोध व बचाव पथकाच्या मदतीने मायलेकाचे मृतदेह बाहेर काढले. लक्ष्मी मनोहर लोणारकर (वय ८०) व लक्ष्मण मनोहर लोणारकर (वय ५४, रा. दस्तुरनगर) असे आत्महत्या करणाऱ्या मायलेकाचे नाव असल्याचे राजापेठचे पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी सांगितले. लक्ष्मण लोणारकर हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.

Loading content, please wait...